जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक २०१७
सध्याचे निवडणुकीचे वातावरण पाहता खूप सारे गोंधळ डोक्यात सुरु होते. एकीकडे सत्ताधारी वर्ग व दुसरीकडे त्याविरोधात जमलेले आपापल्या पद्धतीने प्रयत्न करत असलेले लोक यांचा प्रचार दररोज पाहात होतो. सुरवातीला आर्थिक पाठबळ असलेले पैशाचा सर्रास वापर करत आपला प्रचार करताना दिसत होते तर एकीकडे पैशा अभावी साधा प्रचार चालू होता, ते वातावरण पाहता कोणीही सहज अंदाज लावेल कि सत्ता कोणाच्या हातात जाईल.
या सर्व घडामोडी जाणून घेताना त्यात बारकाईने लक्ष द्यावे असेही वाटत होते. सर्व परिस्थिती पाहता एक अंदाज मनाशी पक्का झालेला होता कि सत्ता परत सत्ताधारी वर्गाकडेच असणार, लोकांनी हि परिस्थिती स्वीकारलेली आहे त्यांना परिवर्तन नको आहे असे वाटत होते (तिकीट भेटण्याच्या काळातली स्थिती ).नंतर पक्षांनी उमेदवार जाहीर केले त्यांच्या प्रचाराचे नारळ फुटले प्रचार सुरु झाला. पैशेवाल्यांनी जे उमेदवार विकत घेता येत होते ते विकत घेतले व बाकीच्यांविरोधात प्रचार मोठं-मोठ्या सभा सुरु झाल्या सुरु झाल्या. प्रत्येक पक्षाचे प्रचार जोरात सुरु असताना दिवसेंदिवस लोकांमधला असंतोष दिसायला सुरवात झाली, चर्चा सुरु झाली. काय करायचे आता? असे प्रश्न विचारायला सुरवात झाली. वातावरण हळूहळू बदलताना दिसू लागले.
असे ठरवले कि लोकांमध्ये जाऊन बघू काय विचार आहेत त्यांचे या निवडणुकीसंदर्भात. मग काय निघाली आमची टीम सर्वे करायला. एक एक गाव घेत लोकांना प्रश्न विचारात त्यांच्या सोबत गप्पा मारत. सुरवातीला त्यांचा "तुम्ही कोणत्या पक्षाकडून आले आहात असा प्रश्न होता?" नंतर गप्पा सुरू झाल्या त्यांच्या शंकांचे निरसन झाले आणि त्यांच्या मानातले बाहेर येण्यास सुरवात झाली. लोकांसोबत चर्चा करत असताना खूप सारे महत्वाचे प्रश्न समोर आलेत त्या लोकांच्या अडचणी समोर आल्या. त्यांनी सांगितलेल्या अडचणी कोणालाही विचार करायला भाग पाडतील अशा होत्या. त्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे पाणी प्रश्न," आपल्या भागात पाण्याची समस्या कधी मिटणार पाणी कधी येणार याची ते आज आज पर्यंत ते वाट पाहात आहे" असे ते सांगत होते. त्यासोबत जे अपेक्षित असे विकास कामे जो व्यक्ती पूर्ण करू शकेल अशा व्यक्तीला नीट पारखूनच आपले मत देऊ असे ते सांगत होते. त्यांच्या बोलण्यात चीड व असंतोष जाणवत होता त्या प्रमाणात त्यांची गरज दिसत होती. मनाला भिडणारे असे अनेक प्रश्न समोर आलेत. दरवेळेस प्रमाणे आश्वासने तेच तेच याचा त्यांना उबग आल्याचा दिसत होते. त्या संदर्भात निवडून येणार उमेदवार नक्की विचार करेल अशीच अपेक्षा ठेऊन ते आहेत.
गावो-गावी लोकांना भेटत असताना बरेच प्रचार करणारे कार्यकर्ते भेटले, उमेदवारही भेटले प्रत्येकाचे मत जाणून घेतले. काही उमेदवार गरीब असल्याकारणाने प्रचार-प्रसारासाठी त्यांच्याकडे पुरेसे पाठबळ नसेल असे वाटत असताना त्यांचा प्रचार करताना बरेच कार्यकर्ते दिसत होते तसे ते सर्वच गावांमध्ये आढळत होते ते प्रत्येकापर्यंत पोहचलेले दिसत होते. प्रत्येक ठिकाणी त्यांच्या बद्दल विचार होत होता.
गावो-गावी लोकांना भेटत असताना बरेच प्रचार करणारे कार्यकर्ते भेटले, उमेदवारही भेटले प्रत्येकाचे मत जाणून घेतले. काही उमेदवार गरीब असल्याकारणाने प्रचार-प्रसारासाठी त्यांच्याकडे पुरेसे पाठबळ नसेल असे वाटत असताना त्यांचा प्रचार करताना बरेच कार्यकर्ते दिसत होते तसे ते सर्वच गावांमध्ये आढळत होते ते प्रत्येकापर्यंत पोहचलेले दिसत होते. प्रत्येक ठिकाणी त्यांच्या बद्दल विचार होत होता.
मग माहिती काढली तर असे समजले कि याकडे पुरेसे पैसे नसताना सुद्धा त्या उमेदवाराचे संपूर्ण गाव त्यासाठी प्रचार करत आहे तेही कोणत्या पैशाच्या मोहापायी (पैसे ना घेता ) वा कोणताही स्वार्थी हेतूने नसून तर सत्ताधार्यांवरील नाराजी व बदल अपेक्षित आहे या उद्देशाने तसेच उमेदवाराप्रती विश्वासाची भावना असल्याकारनाने हे कार्यकर्ते झगडत होते आणि त्यातल्या त्यात त्यांची लोकांकडून घेतली जाणारी दाखल व विश्वास नक्कीच आकर्षित करणारा होता. सुरवातीच्या काळात वाटणारे सर्व अंदाज बदलताना दिसत होते. हे प्रकार पहात असताना लोकांना अजूनही बदल अपेक्षित आहे हे दिसून आले. लोक अजूनही विचार करतात असे दिसून आले. या प्रकारच्या अनोख्या घडामोडी सुद्धा आम्ही अनुभवल्या.
सर्व टीमने केलेल्या या सर्वेमध्ये टीमने मतदानाचे महत्व पटवून दिले. लोकशाही कशी बळकट राहील, आपले मत किती महत्वाचे आहे, लोकशाही टिकवण्यासाठी ते कसे गरजेचे आहे या सर्व गोष्टींची चर्चा त्यांनी लोकांसोबत केली. "पैशाच्या जोरावर सत्ता मिळणारच" हे गृहीत विधान आता नाहीसे होताना दिसत आहे. तरीही आतुरतेने वाट पहात आहोत १६ फेब्रु. २०१७ ची वडगाव गट व तळेगाव गटातील निडणुकीची......
वरील स्थिती वडगाव गट व तळेगाव गटातील निडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनुभवली आहे.
स्वप्निल
चिंचोली गुरव ता. संगमनेर
७४२०९४७२८५
